Ganeshotsav 2020-New Guidelines issued by Maharashtra state [latest update] – wisdom info

0
74

Ganeshotsav 2020-New Guidelines issued by Maharashtra state  [latest update]

महाराष्ट्र सरकारचे चे नवीन नियम – २०२० – गणपती सण साजरा करण्यासाठी जाणून घ्या  काय आहेत

latest update and latest Maharashtra State Circular issued by Home Department :

यंदा गणपती बाप्पा दिनांक २२ ऑगस्ट २०२० रोजी येणार आहेत.  यंदा गणपती लवकर येत आहेत.
जेव्हा नवीन वर्ष सुरु झालं तेव्हा अनेकांनी पहिले गणेश चतुर्थी कधी आहे ते नक्कीच पाहिलं असेल. कारण आपण सर्व भक्त गणपती बाप्पा कधी येतोय याची आतुरतेने वाट पाहत असतो.
Ganeshotsav 2020-New Guidelines issued by Maharashtra state [latest update] - wisdom info
Ganeshotsav 2020-New Guidelines issued by Maharashtra state [latest update] – wisdom info
२०२० चे वर्ष सुरु झाले आणि अनेकांनी अनेक प्रकारची स्वप्ने रंगवली कि यंदा गणेश चतुर्थी साठी काय प्लांनिंग करायची. परंतु यंदा कोरोनाचे संकट संपूर्ण जगात थैमान घालत आहे कोरोना मुले संपूर्ण जगात लॉकडाउन ची प्रक्रिया केली गेली आहे. आपल्या भारतात हि कोरोना विषाणू ने आपले पाय घट्ट केल्याने त्याचा परिणाम यंदाच्या गणेश चतुर्थी वर देखील होणार आहे.
आपण सर्व भक्त गणरायाचे भक्त, लहान थोर मंडळी सर्व कुटुंब, मंडळ एक दिलाने आणि अत्यंत श्रद्धेने गणेशोत्सव साजरा करतो परंतु कोरोनामुळे यंदा आम्हाला गर्दी टाळावी लागणार आहे.

महाराष्ट्र सरकारने  यंदा गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे मात्र काही अटी लागू केल्या आहेत. आज दिनांक ११ जुलै २०२० रोजी गृह विभाग, महाराष्ट्र शासन विभागाकडून या सूचना परिपत्रका द्वारे देण्यात आलेल्या आहेत.

Ganeshotsav 2020 – New Guidelines issued by Maharashtra state

त्या परिपत्रकातील काही महत्वाच्या सूचना पुढील प्रमाणे :
१) सर्वात महत्वाचे म्हणजे यंदा सार्वजनिक मंडळांसाठी श्री गणेशाची मूर्ती हि ४ फुट  आणि घरगुती गणपती २ फूटाचा असणार आहे.  या पेक्षा मोठी मूर्ती स्थापन करता येणार नाही.
२) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवासाठी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
३) कोविड-१९ मुळे  उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. उच्च न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशाशनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित मंडप उभारण्यात यावेत.
४) या वर्षी शक्य तो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी धातू/संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरण पूरक असल्यास शक्यतो घरच्या घरी विसर्जन करावे. विसर्जन घरी करण्यास शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी करण्यात यावे. गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास गणेश मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी २०२१ रोजी भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्ये आहे. जेणेकरून आगमन/विसर्जनाची गर्दीत जाणे टाळून स्वतःची आणि कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगापासून रक्षण होईल.
५) आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच ध्वनी प्रदूषण नियमांचे व तरतुदींचे पालन करावे.
६) जाहिराती करून गर्दी आकर्षित होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी.
७) सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच कोरोना, मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती सारखे कार्यक्रम आयोजित करावेत.
८) सार्वजनिक मंडळांनी मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. फिजिकल डिस्टंसिंग आणि मास्क सॅनिटायझर यांचे विशेष लक्ष द्यावे.
९) शक्य झाल्यास श्री गणेशा चे दर्शन ऑनलाईन मार्फत, केबल नेटवर्क, वेबसाईट फेसबुक द्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
१०) श्री चे आगमन/विसर्जनाच्या वेळी मिरवणुका काढू नयेत. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने अशा सोहळ्यात सामील होऊ नये. संपूर्ण चाळीतील / घरगुती गणपती एकत्र काढू नये.
११) कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध शासकीय यंत्रणेने तसेच पोलीस प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे.
एकंदरीत परिपत्रकाची अवलोकन केले तर लोकांच्या सुरक्षेला महत्व दिले गेले आहे. गणेशोत्सव साजरा करावा पण वरील अटींचे पालन करणे आवश्यक असणार आहे.
हे गणपती बाप्पा यंदा तुझे आगमन थाटामाटात किंवा मनाजोगे करता येणार नाही तरीही आपण सर्व भक्तानी एक प्रण करूया कि हे आगमन जरी थाटामाटात करता आले नाही तरी तो आनंद आपण आपल्या मनातून कमी करायचा नाही.
गणपती बाप्पा येणार आणि त्याचे स्वागत आपण अंतर्मनाने मोठ्या आनंदाने करूया.
आपली आणि आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा सांभाळून आपण मोठ्या हर्षात हा सण  साजरा करूया.
हा लेख तुम्हाला पसंद आल्यास नक्की तो आपल्या मित्रांसोबत तसेच share करा आणि यंदा तुम्ही तुमचा गणेशोत्सव कसा साजरा करणार हे comment मध्ये नक्की कळवा
Title: Ganeshotsav 2020-New Guidelines issued by Maharashtra state [latest update]
Maharashtra state issued new guidelines for Ganeshotsav 2020 with the safety instruction of COVID-19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here